दीपिकाचा ‘छपाक’ इंटरनेटवर लीक, निर्मात्यांना होऊ शकतं नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chhapaak

दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेस्सी अभिनित छपाक हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण प्रदर्शनाला काही तास उलटत नाहीत, तोच छपाक इंटरनेटवर लीक झाला आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या चित्रपटांना लीक करण्यासाठी कुख्यात असलेल्या तमिळ रॉकर्सनेच हा चित्रपट लीक केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

छपाक प्रदर्शित होण्याच्या दिवशीच तो इंटरनेटवर लीक झाल्याचं वृत्त आहे. यावर निर्मात्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नसली, तरी त्यांना यामुळे नुकसान होऊ शकतं. चित्रपटातील दीपिकाचा अभिनय पाहून अनेकांनी तिला आजवरची सर्वात सशक्त भूमिका असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या दिवशी छपाकच्या कमाईचा आकडा 4.5 कोटी इतका असला तरी विकएन्डच्या दिवशी हा चित्रपट चांगली कमाई करेल, असं चित्र आहे.

छपाक हा चित्रपट अॅसिड हल्ल्याची पीडिता लक्ष्मी अगरवाल हिच्या आयुष्यावर आधारित आहे. दीपिकाने यात मध्यवर्ती भूमिका साकारली असून लक्ष्मी अगरवाल हिचा अॅसिडच्या सुट्या विक्रीवर प्रतिबंध आणण्याचा कायदेशीर लढा यात दाखवण्यात आला आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.