‘या’ कारणामुळे सोशल मीडियावर दीपिका पदुकोण ट्रोल…

1026

चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. यावेळी हा वाद तिच्या एका टिकटॉक व्हिडीओशी संबंधित आहे. छपाक या चित्रपटासाठी दीपिका पदुकोणने एक व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओत ती फबी मेकअप आर्टिस्ट नावाच्या एका टिकटॉक पर्सनॅलिटीला तिच्या चित्रपटाचे तीन लूक बनवण्यास सांगत आहे. ज्यात ‘ओम शांती ओम’, ‘पिंकू’ आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘छपाक’ या चित्रपटाचा समावेश आहे.

दीपिकाच्या सांगण्यानंतर ही मेकअप आर्टिस्ट या वेगवेगळ्या लूकमध्ये दिसते. ज्यात छपाकच्या लुकचाही समावेश आहे. नेटकरी याच गोष्टीवरून दीपिकाला ट्रोल करत आहेत. छपाकचा लूक करण्यास ती कोणाला कसं सांगू शकते. कारण ही एका मुलीसोबत घडलेली र्दुदैवी घटना आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. अशातच एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ‘हे खूप वाईट आणि असंवेदनशील आहे, ती असं करताना काय विचार करत होती?’. तर काही लोक हे खूप चुकीचं असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. मात्र यावर दीपिकाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या