नैराश्यग्रस्तांसाठी दीपिका दाखवणार आशेचा किरण!

454

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणलादेखील एकेकाळी नैराश्याचा सामना करावा लागला होता. त्यातून बाहेर पडल्यानंतर मानसिक तणावातून जाणाऱया लोकांसाठी तिने द लाइव्ह लव्ह लाफ फाउंडेशनची स्थापना केली होती. हे फाउंडेशन लोकांना मानसिक आजाराविरुद्ध लढण्यासाठी मदत करण्यासाठी करते. नुकताच तिच्या फाऊंडेशनतर्फे नैराश्यग्रस्तांवर उपचार करणाऱया डॉक्टरांसाठी कोर्स सुरू केला आहे.

नैराश्याग्रस्तांना आशेचा किरण दाखवण्यासाठी पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया, देशातील एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य संघटना आणि असोसिएशन ऑफ हेल्थकेयर प्रोवाइडर्स यांच्या सहकार्याने हा कोर्स सुरू केला आहे. हा कोर्स सुरू करण्याचे उद्दिष्ट म्हणजे मानसिक विकार ओळखणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्राथमिक काळजी घेणाऱया डॉक्टरांच्या ज्ञान, कौशल्यात भर घालणे असा आहे. आतापर्यंत 17 राज्यांतील 143 प्राथमिक देखभाल करणाऱया चिकित्सकांनी अभ्यासक्रमाच्या पहिल्या टप्प्यात नोंदणी ऑनलाईन केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या