दीपिका म्हणते, तुम्ही एकटे नाही

देशात कोरोना महामारीचा प्रकोप वाढत आहे. सतत कानावर पडणाऱया नकारात्मक बातम्या, आयसोलेशनमध्ये एकटे पडण्याची भीती, यामुळे लोक तणावात आहेत. लोकांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. अशातच अभिनेत्री दीपिका पदुकोण चाहत्यांना मानसिक आधार देण्यासाठी सरसावली आहे.

दीपिकाने मानसिक आरोग्याशी संबंधित काही हेल्पलाईन नंबर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दीपिकाने पोस्टमध्ये लिहिलंय, ‘‘मी, माझं कुटुंब आणि आपण सर्वच या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा वेळी लक्षात ठेवा की, आपल्याला भावनिकदृष्टय़ा मजबूत राहायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही, आपण सगळे एकत्र आहोत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हाच आशेचा किरण आहे.’’

गेल्या काही वर्षांपासून दीपिका मानसिक स्वास्थासाठी अभियान चालवत आहे. स्वतः नैराश्यासारख्या समस्येला तोंड दिल्यानंतर मानसिक आजारांविषयी ती सातत्याने जनजागृती करत आहे. 2015 साली तिने ‘लिव्ह लव्ह लाफ’ ही एनजीओ सुरू केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या