दीपिका पदुकोणने दिली गुडन्यूज!

3874
आज 5 जानेवारी म्हणजे बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पदुकोण हिचा वाढदिवस. या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या काही गाजलेल्या भूमिकांविषयी

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ आणि कबीर खान दिग्दर्शित ’83’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असलेली दीपिका बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

काही दिवसांपूर्वी तिच्या गरोदरपणाच्या चर्चा रंगल्या होत्या. तिने त्या सर्व शक्यता धुडकावूनही लावल्या होत्या. जानेवारी 2018 मध्ये तिचा पद्मावत झळकल्यानंतर अवघ्या दहा महिन्यांत तिने रणवीर सिंगशी लग्नगाठ बांधली होती. 2018नंतर अद्यापपर्यंत तिचा एकही चित्रपट न झळकल्याने या चर्चांना आणखी रंग चढू लागले होते. आता काही गोष्टी स्पष्ट होताना दिसत आहेत.

बॉलिवूडची मस्तानी, पद्मावती अशी बिरुदावली मिरवणारी दीपिका आता आणखी एका ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे. महाभारतावर येणाऱ्या चित्रपटामध्ये दीपिका द्रौपदीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची सहनिर्मातीही तीच असून तिच्यासोबत मधु मंटेनाही या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चित्रपट व्यवसाय समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती शेअर केली आहे. या चित्रपटाची निर्मिती काही भागांमध्ये होणार असून 2021च्या दिवाळीपर्यंत पहिला भाग प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या