लग्नानंतर पहिल्यांदाच दीपिका रणबीरसोबत एकत्र

1382

अभिनेत्री दीपिका पदूकोण हिचे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अभिनेता रणवीर सिंग सोबत लग्न झाले. पुढच्या महिन्यात हे जोडपे त्यांची पहिला लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहेत. या दोघांचा सुखीसंसार सुरू असतानाच दीपिकाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.


View this post on Instagram

#deepikapadukone #RanbirKapoor at director Luv Ranjan office #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दीपिका व रणबीर कपूर हे लवकरच दिग्दर्शक लव्ह रंजनच्या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटासाठी लव्ह रंजन यांनी रणबीर व दीपिकाशी करार केल्याचे समजते. त्या दोघांच्या शूटींगच्या  तारखाही निश्चित झाल्या असून येत्या फेब्रुवारी महिन्यात या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात होणार आहे.

रणवीरसोबत अफेयरच्या आधी दीपिकाचे रणबीर कपूरसोबत अफेयर होते. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. दीपिकाशी ब्रेकअप करून रणबीर कतरिनासोबत प्रेमसंबंधात होता. मात्र रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर दीपिका नैराश्यात देखील गेली होती.

आपली प्रतिक्रिया द्या