Defence Deal – स्पाइस 1000, ड्रोन, पिनाका रॉकेट…, सैन्याला मिळणार बळ; 80 हजार कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजुरी

ऑपरेशन सिंदूरमुळे आधीच बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेल्या पाकिस्तानला आता पुन्हा एकदा घाम फुटणार आहे. हिंदुस्थानच्या सैन्याला अधिक बळकट करण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. क्षेपणास्त्र, फुल मिशन सिम्युलेटर आणि SPICE-1000 लाँग रेंज गायडन्स किट यांसारख्या शस्त्रांच्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हिंदुस्थानच्या नौदल आणि हवाई दलाची संरक्षण यंत्रणा अधिक ताकदवार होणार आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 29 डिसेंबर रोजी झालेल्या डिफेन्स एक्विजिशन काऊंन्सिलच्या बैठकीत तिन्ही सशस्त्र दलांसाठी 79 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण करारांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीत संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते. लष्कराच्या ताकदीवर भर देण्यासाठी T-90 टँक आणि MI-17 हेलिकॉप्टर अपग्रेड करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे. संरक्षण क्षेत्रातील उपक्रमांअंतर्गत 200 T-200 टॅंकला स्वदेशी टेक्नोलॉजीसोबत अपग्रेड केले जाणार आहे. याचसोबत MI-17 हेलिकॉप्टरचे मिडलाईफही अपग्रेड होणार आहे.

तसेच नौदल आणि हवाई दलासाठी रेंज सरफेस टू एअर मिसाइलही विकत घेतले जाणार आहे. त्यामुळे दोन्ही दलांची ताकद वाढणार आहे. याचा फायदा युद्धादरम्यान होईल.

हिंदुस्थानी लष्कराच्या तोफखान्याची ताकद वाढवण्यासाठी 20 किलोमीटरपर्यंत पोहोचणाऱ्या गाईडेड पिनाका रॉकेट्सच्या डेव्हलपमेंटलाही मंजुरी देण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंधूर’ दरम्यान पिनाका रॉकेट्सने ज्या प्रकारे कामगिरी केली होती, ती पाहता या नवीन प्रगत रॉकेट्समुळे पाकिस्तानला पुन्हा बंकरमध्ये लपण्याची तयारी करावी लागणार आहे.