राफेलवर ओम् काढला ही आमची शस्त्रपूजाच

499

मी हिंदुस्थानात असतो तर घरीच शस्त्रपूजन केले असते, पण मी फ्रान्समध्ये होतो. म्हणूनच राफेलवर ओम् काढला. ही आमची शस्त्रपूजाच आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.  370 कलमावरूनही त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारासाठी मीरा रोड येथे प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, हिंदुस्थानात दसर्‍याला शस्त्र्ापूजा करण्याची परंपरा आहे. योगायोगाने दसर्‍याला फ्रान्समध्ये होतो आणि तेथे अत्याधुनिक शस्त्र हिंदुस्थानी लष्कराच्या ताब्यात येणार होते. त्यामुळेच मी राफेल विमानाचे पूजन केले, असे सांगितले. दरम्यान त्यांनी कश्मीरमधील 370 कलम हा देशांतर्गत विषय असताना काँग्रेस त्याला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवू पाहात आहे. यामागे त्यांचा हेतू काय हे सर्वांनाच माहीत आहे, अशी जोरदार टीका राजनाथ सिंह यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या