कसे मारले बगदादीला? अमेरिकेने जारी केला हल्ल्याचा व्हिडीओ

1647
baghdadi-video-pentagon

बगदादीचा खात्मा करणाऱ्या विशेष कमांडो पथकाच्या कारवाईचा सॅटेलाइट व्हिडीओ आणि फोटो अमेरिकन लष्कराने प्रसिद्ध केले आहेत. यात बगदादी जिथे लपून बसला होता त्या घराभोवतीचा परिसर, मोठी भिंत आणि सुरू असलेल्या कारवाईचा ब्लॅक आणि व्हाइट व्हिडीओ सादर केला. सीरियाच्या इदलिब भागात बगदादीच्या साथीदारांनी अमेरिकन हेलिकॉप्टरवर केलेला गोळीबार आणि त्यानंतर अमेरिकन सैन्याने दिलेले प्रत्युत्तर याचाही एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

अमेरिकेच्या लष्कराने आज पेंटागॉनमध्ये पत्रकार परिषद घेऊन बगदादीच्या खात्म्याचा व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध केले. यावेळी जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी माध्यमांना माहिती दिली. मॅकेन्झी म्हणाले, ‘धर्मांध आणि कट्टर विचारसरणी असलेली इसिस आहे. त्यामुळे फक्त बगदादीचा खात्मा झाला म्हणजे इसिसचा धोका टळला आहे असे आम्हाला वाटत नाही. इसिसचा धोका कायम आहे. ही संघटना पुन्हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने दहशतवादी हल्ला करू शकते.’

इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याच्या खात्म्यानंतरही ही दहशतवादी संघटना तितकीच धोकादायक आहे. धर्मांध आणि कट्टर विचारसरणी असलेली ही संघटना बगदादीच्या खात्म्याचा बदला घेण्यासाठी इसिस पुन्हा हल्ला करेल. त्यामुळे इसिसचा धोका कायम आहे, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या