
नामांकित बँकेत नोकरीच्या नावाखाली ठगाने महिलेची 11 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पूर्व सायबर पोलिसांनी चारजणांविरोधात गुन्हा नोंद आहे. तक्रारदार या मुलुंड येथे राहतात. त्यांनी एका खासगी संकेतस्थळावर नोकरीसाठी अर्ज केला. त्यानंतर अज्ञाताने पह्न करून बँकेत नोकरी उपलब्ध असल्याच्या भूलथापा मारल्या.
नोकरीसाठी प्रोसेस फी भरण्यास सांगितले. काही वेळाने आणखी एकाने पह्न करून त्याची ऑनलाईन मुलाखत घेतली. विश्वास बसावा म्हणून तिला बनावट नियुक्तीपत्र पाठवले. त्यावर विश्वास ठेवून त्याने 11 लाख 28 हजार रुपये ट्रान्स्फर केले. पैसे भरल्यानंतरदेखील बँकेकडून नोकरीबाबत पह्न आला नाही. संबंधितांचा पह्न बंद येत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसात तक्रार केली.



























































