
आळंदी येथे रविवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. देहू संस्थानकडून देखील वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.
“काल आळंदीत वारकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज निंदनिय आहे. याबद्दल प्रशासनाने आणि वारकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, वारकरी हा सहिष्णू असतो त्यांची अशाप्रकारे पोलिसांनी अडवणूक करायला नको होती. महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम पोलिसांनी केल आहे. वारकरी हे पोलिसांना सहकार्य करतीलच, मात्र प्रशासनानं याचं आत्मचिंतन करावं, या घटनेचा प्रशासनाने खोलवर तपास करावा, असं देहू विश्वस्तांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.



























































