व्हॉट्सअॅपवर डीलीट केलेले मेसेजस कसे वाचावे?

व्हॉट्सअॅपवर ‘डीलीटेड फॉर ऑल’ हे फीचर आहे. त्यामुळे अनेकवेळा चुकीचे आलेले मेसेजेस युजर्सला डीलीट करता येतात. तसेच त्या युजरने नेमका काय मेसेज टाकला होता हे कळत नाही. हा फीचर चांगला असला तरी अनेकवेळा त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. हे डीलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी खास टिप्स आहेत.

व्हॉट्सअॅपवर डीलीटेड मेसेज वाचण्यासाठी प्ले स्टोअरवर एक अॅप आहे. त्या अॅपचे नाव आहे Notification history. हे अॅप तुम्ही प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा. त्यानंतर हे अॅप जे परमिशन मागेल ती द्या. त्यानंतर हे अॅप इन्स्टॉल होईल. जेव्हा कोणी कुठल्याही व्यक्तीने पाठवलेला मेसेज डीलीट झालेला असेल किंवा ग्रुपवर युजरने पाठवलेला मेसेज डीलीट केलेला असेल तर तो डीलीट झालेला मेसेज तुम्हाला Notification history अॅपमध्ये दिले.

या अॅपशिवायही तुम्हाला डीलीट झालेले मेसेजेस दिसू शकतात. त्यासाठी तुमच्या फोनमध्ये सेटिंगमध्ये नोटिफिकशन मध्ये जावे लागेल. नंतर नोटिफिकशनमध्ये गेल्यावर व्हॉट्सअॅपवर क्लिक करा. नंतर व्हॉट्सअॅपसाठीच्या सर्व नोटिफिकेशन इनेबल करा. त्यामुळे ग्रुप असो वा पर्सनल मेसेजेसचे नोटिफिकेशन तुम्हाला दिसतील. तसेच डीलीट झालेले मेसेजही दिसू शकतात.

Notification history अॅपच्या काही मर्यादाही आहेत. या अॅपमध्ये फक्त डीलीट झालेली 100 अक्षरं दिसतात. म्हणजेच कुणी व्यक्तीने 100 अक्षरापेंक्षा जास्त अक्षरांत मेसेज लिहिला असेल तर तुम्हाला फक्त 100 अक्षरंच दिसतील. दुसरी मर्यादा अशी की यात फक्त डीलीट झालेली अक्षरं दिसतात. जर कोणी फोटो, ऑडियो किंवा इतर फाईल पाठवलेली असेल आणि जर कोणी डीलीट केली तर ती दिसणार नाही. तसेच जर तुम्ही फोन रीस्टार्ट केला तर या नोटिफिकेशन डीलीट होतात आणि हे डीलीट झालेले मेसेजेस दिसत नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या