टिकटॉकवरून 60 लाख व्हिडीओ हटवले

tiktok-f

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

तरुणाईला वेड लावणारे टिकटॉक ऍप केंद्र सरकारच्या निर्देशानंतर प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहे. त्याचबरोबर नवी दिल्लीटिक टॉक कंपनीने ऍपकरील 60 लाखांहून अधिक व्हिडीओ हटवले आहेत. गेल्या जुलैपासून आतापर्यंत नियमांचे उल्लंघन करणारे व्हिडीओ ऍपकरून हटवल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे.

टिक टॉक ऍप ऍपच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ आणि हिंसाचारास प्रोत्साहन देणारे व्हिडीओ अपलोड होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर हायकोर्टात ऍपकर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल झाली होती. हायकोर्टाने ऍपकर बंदी आणण्याचे निर्देश सरकारला दिले होते. त्यानुसार, गुगल आणि ऍपलच्या प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्यात आले आहे. टीक टॉकचा वापर फक्त 13 वर्षांवरील मुले करू शकतात. कमी वयाची मुले या ऍपचा वापर करू शकणार नाहीत, असेही कंपनीने सांगितले.