मेहुलच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या आरोग्यविषयक तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक नेमण्याचे आदेश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले. या पथकाच्या वैद्यकीय अहवालानंतरच मेहुल चोक्सी हवाई प्रवासासाठी फिट आहे का, यावर न्यायालय निर्णय घेणार आहे.

पीएनबी घोटाळय़ानंतर एटिंगा येथे पळालेल्या चोक्सीने ‘मी पळालो नसून उपचारासाठी मी परदेशात आलो आहे. घोटाळय़ातील तपासाला सहकार्य करण्याची माझी इच्छा आहे. पण तब्येत बरी नसल्यामुळे मी हवाई प्रवास करू शकत नाही,’ असे कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून म्हटले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने मेहुलच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक स्थापण्याचे आदेश दिले आहेत.