आसाराम बापूला 50 लाखांचा चुना

सामना ऑनालाईन। नवी दिल्ली

स्वतःला केंद्रीय न्याय मंत्रालयातील मुख्य सल्लागार असल्याचे भासवून बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूला सोडवण्यासाठी 50 लाखांमध्ये सौदा करणाऱया नितीन आणि शीखा गुप्ता या दांपत्याला राजस्थान पोलिसांनी सोमवारी अटक केली. सौद्यासाठी या दांपत्याने 7 महिन्यांपूर्वी जोधपूर कारागृहात जाऊन आसाराम यांची भेटही घेतली होती. एवढेच नाही तर नोकरीचे आमीष दाखवून या दांपत्याने असंख्य तरुणांना कोटय़वधी रुपयांचा गंडाही घातला होता.

नितीन गुप्ता हा उत्तर-पश्चिम रेल्वेच्या झोनल रेल्वे युजर कंसल्टंट कमिटीचा सदस्य आहे.कमिटीची सदस्यता मिळण्यासाठी त्याच्या नावाची शिफारस उपराष्ट्रपती कार्यालयातील एका पीएसने केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.