हिंदुस्थानच्या राज्यघटनेला येत्या 26 नोव्हेंबर रोजी 70 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलावले आहे.
पहाटे सूर्योदयाला सुरू होणारे हे अधिवेशन साधारण दोन तास चालेल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या अधिवेशनाला संबोधित करणार असून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधानांसह दोन्ही सभागृहांचे सदस्यही या अधिवेशनाला उपस्थित राहतील.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1945 रोजी हिंदुस्थानची राज्यघटना लिहून पूर्ण केली. दोन वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांत लिहून पूर्ण झालेल्या राज्यघटनेवर 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या 284 सदस्यांनी सह्या केल्या. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी हिंदुस्थानात राज्यघटना लागू केली.

























































