दिल्ली – सीएएविरोधातीत मोर्चादरम्यान तरुणाचा खुलेआम गोळीबार, एक जखमी

951

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (NRC) विरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ ते राजघाट मार्गापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान एका तरुणाने खुलेआम गोळीबार केला. या गोळीबारामध्ये आंदोलनातील एक तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ ते राजघाट मार्गापर्यंत गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी दिल्ली पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मोर्चाच्या सुरुवातीला एक तरुण पिस्तूल घेऊन आणि गोंधळ घालू लागला. पोलिसांच्या समोरच तरुणाने गोळीबार केला. यात एक तरुण जखमी झाला.

जोशमे होश गवाँ बैठा, शरजील इमामची कबुली

दरम्यान, जखमी तरुण हा विद्यार्थी असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे. तरुणाचे नाव गोपाळ असल्याचे समोर आले आहे.  तरुणाचा गोळीबार करतानाचा एक व्हिडीओही समोर आला असून या व्हिडीओचाही तपास सुरू असल्याचे साऊथ ईस्ट दिल्लीचे डीसीपी चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले.

‘वंदे मातरम’ची घोषणाबाजी
गोळीबार करणारा तरुण भारत माता की जय, दिल्ली पोलीस झिंदाबाद, वंदे मातरम् अशा घोषणा देत असल्याचे घटनास्थळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. सध्या हा तरुण अटकेत असून दिल्ली पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

गर्लफ्रेंडमुळे पकडला गेला शरजीलला, पोलिसांची सूत्रांचा दावा

आपली प्रतिक्रिया द्या