
दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूला एका अनोळखी तरुणीने वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत ब्लॅकमेल केलं. नंबर ब्लॉक केला असता दुसऱ्या नंबरवरून त्याला फोन करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सुद्धा 21 वर्षीय विपराज निगमने केला आहे. या प्रकरणी विपराज निगमने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, विपराज निगमसोबत हा सर्व प्रकार रविवारी (9 नोव्हेंबर 2025) घडला आहे. त्याला अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरहून अनेक वेळा फोन येऊ लागले. त्याच्याकडे काही गोष्टींची मागणी करण्यात आली होती. तसेच मागणी पूर्ण न केल्यास एक व्हिडीओ ऑनलाईन व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या विपराजने तात्काळ पोलीस स्थानक घाटलं आणि तक्रार दाखल केली. त्याने तक्रारीमध्ये अनोळखी महिलेवर सार्वजनिकरित्या बदनाम केल्याचा आणि मानसिकरित्या छळ केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
विपराज निगमला IPL 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची संधी मिळाली होती. विपराजला दिल्लीने 50 लाख रुपये किंमतीला खरेदी केले होते. त्याने मागील हंगामात 14 सामन्यांमध्ये फलंदाजी केली आणि 142 धावा केल्या तसेच एक विकेट सुद्धा त्याच्या नावावर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये विराप निगम उत्तर प्रदेशकडून खेळतो.





























































