
दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात 10 नोव्हेंबर रोजी कारमध्ये मोठा स्फोट झाला. या भयंकर स्फोटामध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकांवर अजूनही रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याच दरम्यान उपचार घेत असलेल्या आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे दिल्ली अपघातात मृतांची संख्या आता 15 झाली आहे.
दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये सायंकाळी सातच्या सुमारास भयंकर स्फोट झाला. या स्फोटाची तिव्रता इतकी भयानक होतो की, त्या परिसरातील आजूबाजूच्या अनेक गाड्यांच्या काचा तुटल्या. मोठ्या प्रमाणात गाड्यांचे नुकसान झाले आणि जीवितहानीही झाली. या आत्मघातकी हल्ल्यामुळे सारा देश हादरून गेला आणि देशभरातील प्रमुख शहरांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. याप्रकरणी NIA ने स्फोट झालेल्या गाडीचा मालक आमिर रशिद याला अटक केली असून त्याला पटियाला हाउस कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला 10 दिवसांसाठी NIA कोठडी सुनावली आहे.






















































