Liquor Policy Case : अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजूर

कथित मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी मोठा दिलासा मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण प्रकरणात राऊन्ज एवेन्यू कोर्टाने जामीन मिळाला आहे. न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

दिल्लीच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला अटक करण्यात आली होती.