राज्यपालांविरुद्धच्या याचिकेवर आज निकाल

दिल्ली महापालिकेत मंत्र्यांशी चर्चा न करताच नायब राज्यपाल नामनिर्देशित व्यक्तीची नियुक्ती करण्याच्या निर्णयाला दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि जे बी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने गेल्यावर्षी 17 मे रोजी या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता.

दिल्ली सरकारच्या याचिकेवर उद्या न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ निकालाचे वाचन करेल. दिल्ली महापालिकेत नायब रपाज्यपाल नामनिर्देशित व्यक्तीची किंवा प्रशासकीय व्यक्तीची नियुक्ती करणे म्हणजे दिल्ली महापालिका अस्थिर करण्यासारखे आहे, असे गेल्यावर्षी 17 मे रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालय म्हणाले होते.