दिल्ली पुन्हा हादरली, अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्कार, धारदार वस्तूने शरीरभर केले वार

1603

दिल्लीतील पश्चिम विहार वेस्टमधील पीरागढी भागात एका 12 वर्षीय मुलीवर काही नराधमांनी अगदी हैवानालाही लाजवेल असा प्रकार केला आहे. या नराधमांनी मुलीवर सामूहीक बलात्कार करून नंतर तिच्या संपूर्ण शरीरावर धारदार वस्तूने वार केले. संपूर्ण शरीर रक्ताने माखलेल्या अवस्थेत पोलिसांनी त्या मुलीला रुग्णालयात दाखल केले. या मुलीच्या शरीरासह, गुप्तांगावर देखील गंभीर जखमा आहेत. मुलीवर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगळवारी संध्याकाळी पीडित मुलगी घरात एकटी असताना तिच्या घरात घुसलेल्या काही नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी धारदार वस्तूने शरीरावर तसेच तिच्या गुप्तांगावर वार केले आहेत. त्यानंतर ते नराधम तेथून पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलगी कशीबशी घसरत शेजारांच्या दारापर्यंत पोहोचली. नग्नावस्थेत शरीरभर जखमांनी भरलेल्या त्या मुलीला पाहून शेजारीही हादरले. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवत मुलीला संजय गांधी रुग्णालयात दाखल केले. तेथून डॉक्टरांनी मुलीला एम्स रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून नराधम आसपासच्या परिसरातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या