दहशतवादाला फंडिंग करणाऱ्या पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश

803

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

हिंदुस्थानला 370 कलमावरून घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानचे बुरे दिन सुरू झाले आहेत. दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद रोखण्यात पाकिस्तान अयशस्वी झाल्याने फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे.

एफएटीएफच्या एशियन पॅसिफीक समूहाने वैश्विक मानांकनावर दहशतवादांचे फंडिंग रोखू न शिकल्याने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकल्याची माहिती हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी दिली आहे. एफएटीएफने केलेल्या तपासणीत पाकिस्तानने दहशतवाद्यांचे फंडिग रोखण्यासाठी आखून दिलेल्या 40 नियमांपैकी 32 नियमांचे पालन केले नसल्याचे समोर आले. त्यानंतर एफएटीएफने पाकिस्तानचा समावेश काळ्या यादीत केला.

पाकिस्तानचा 2018 साली ग्रे यादीतही समावेश

पाकिस्तानला 2018 साली जून महिन्यात ग्रे यादीत टाकण्यात आले होते. ऑक्टोबर 2018 आणि फेब्रुवारी 2019 मध्येही पाकिस्तानला दिलासा मिळाला नव्हता. तेव्हाही एफएटीएफने दिलेले निर्देश पाळण्यात पाकिस्तान अयशस्वी ठरले होते.

पाकिस्तानला बसणार आर्थिक फटका
काळ्या यादीत नाव समाविष्ट झाल्याने पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कारण ज्या देशाचे नाव काळ्या यादीत टाकले जाते त्या देशाला कर्ज देणे जोखमीचे समजले जाते. त्यातच पाकिस्तानची आर्थिक स्थिती वाईट असून आंतरराष्ट्रीय कर्जदात्यांनीही पाकिस्तानला कर्ज देताना हात आखडता घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या