पिनाकी चंद्रा यांची लोकपालपदी नियुक्ती

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देशाचे पहिले लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्रा घोष यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. तर सशस्त्र् सीमा बलचे माजी प्रमुख अर्चना रामसुंदरम, महाराष्ट्राचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, महेंदर सिंग, इंद्रजीतप्रसाद गौतम यांची लोकपालचे गैरन्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. तर दिलीप बी. भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अभिलाषा कुमारी, अजयकुमार त्रिपाठी या सर्व न्यायाधीशांची न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्त्यांची शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील निवड समिनीने केल्या होत्या. याला राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी मंजुरी दिली.