प्रदूषणाचा अडथळा, पण नवी दिल्लीतील टी-20 लढत होणार

288

नवी दिल्ली येथील वाढते प्रदूषण व हवेची खालावलेली पातळी यावरून हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यामध्ये येत्या 3 नोव्हेंबरला होणाऱया पहिल्या टी-20 लढतीच्या आयोजनावर सावट असले तरी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुली व टीम इंडियाचा ट्वेण्टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी या लढतीला ग्रीन सिग्नल दाखवला आहे. त्यामुळे ही लढत होईल हे निश्चित झाले आहे. मात्र बांगलादेशचा संघ गुरुवारी हिंदुस्थानात दाखल झाल्यानंतर लिटन दास या त्यांच्या खेळाडूंनी चेहऱयाला मास्क लावून सराव केल्यामुळे पुन्हा एकदा नवी दिल्लीतील प्रदूषणाची समस्या पुढे आली आहे.

नवी दिल्लीतील प्रदूषणामुळे क्रिकेट लढतीच्या आयोजनावर विपरित परिणाम होत असल्यामुळे यापुढे दिवाळीनंतर अर्थातच हिवाळ्यात उत्तर विभागात आंतरराष्ट्रीय लढती खेळवण्यात येणार नाहीत, असे स्पष्ट मत सौरभ गांगुलीने यावेळी व्यक्त केले.

कोणतीही तक्रार नाही – रोहित शर्मा

मी नुकताच नवी दिल्लीत आलो आहे. येथील वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागेल. गेल्या वेळी श्रीलंकेविरुद्धचा कसोटी सामनाही याच वातावरणात झाला. त्यामुळे 3 नोव्हेंबरची लढतही नक्की होईल. मला याबाबत कोणतीही तक्रार नाहीए, असे रोहित शर्मा यावेळी म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या