यमुना कोपली; दिल्लीत घरे पाण्याखाली, रस्तेही बंद

यमुना नदीने रुद्रावतार धारण केल्यामुळे दिल्लीसह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. असंख्य घरे पाण्याखाली गेली असून संतताधर पावसामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी झपाटयाने वाढत आहे. नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडली असून 200.41 वर पाणी पातळी पोहोचली आहे. 63 वर्षात यमुनेने चौथ्यांदा ही धोक्याची पाणीपातळी गाठली आहे. त्यामुळए हजारो लोकांना सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. सकाळी नदीचे पाणी दिल्ली मंत्रालयापर्यंत पोहोचले. मयूर बिहार फेज-1 मधील शिबीरातही पाणी घुसले, स्वामी नारायण मंदिर, फुट ओव्हर ब्रिज, सिव्हिल लाईन या भागातील बंगलेही पाण्याखाली गेले.