प्रचारात बॅनर्स, होर्डिंग्जसाठी प्लॅस्टिकचा वापर कशाला?- सर्वोच्च न्यायालय

507
supreme-court

निवडणूक काळात बॅनर्स, होर्डिंग्ज यात प्लॅस्टिकचा वापर कशाला करता, असे विचारत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला खडसावले. एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने चार आठवडय़ांत उत्तर देण्यासही बजावले आहे.

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने याबाबतची नोटीस पर्यावरण आणि वन मंत्रालयालाही जारी केली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील निवडणूक आयोगांच्या अधिकाऱयांना प्रचारात प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते, मात्र त्या आदेशाविरोधात डब्ल्यू. एडवीन विल्सन यांनी केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने आपल्या आदेशात प्रचारातील बॅनर्स आणि होर्डिंग्जमध्ये प्लॅस्टिकचा वापर नको असे स्पष्ट म्हटले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने या वेळी निदर्शनास आणले. वास्तविक, अशा प्रकारचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत आहे. निवडणुकीत होर्डिंग्ज आणि बॅनर्ससाठी प्लॅस्टिकचा वापर करण्यात येतो. निवडणूक संपली की हा कचरा सर्वत्र पसरतो. या प्रदूषणामुळे मोठी हानी होते, असे विल्सन यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या