एका महिलेसह दोन खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक, हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट

594

पंजाब पोलिसांनी एका महिलेसह दोन खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली आहे. हिंदू संघटनांच्या अनेक बड्या नेत्यांच्या हत्येचा कट या दहशतवाद्यांनी आखल्याचे समोर आले आहे.

या दहशतवाद्याच्या निशाण्यावर अनेक हिंदू संघटनेचे ज्येष्ठ नेते होते. त्याचबरोबर पंजाबमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया करण्याची त्यांची योजना होती. त्यासाठी परदेशातून त्यांना फडींगही मिळत होते. पण पंजाब पोलिसांच्या विशेष पथकाने योग्यवेळी कारवाई करत या तिघा दहशतवाद्यांना अटक केली. दरम्यान यातील महिला दहशतवादी लुधियानामधील एका रुग्णालयात नर्स (परिचारिका) म्हणून काम करत होती.

आपली प्रतिक्रिया द्या