आधीच्या प्रियकरासोबत मिळून तरुणीने केली लिव्ह इन पार्टनरची हत्या, असा झाला खुलासा

दिल्लीचा युपीएसची तयारी करणारा रामकेश मीणा याच्या हत्येचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. यूपीएसची तयारी करत असलेला रामकेश हत्याकांड प्रकरणी त्याची लिव्ह इन पार्टनर अमृतासह तिच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

अमृता चौहान (27), सुमित कश्यप(27) आणि संदीप कुमार (29) अशी आरोपींची नावे आहेत. अमृताने आरोप केला की, रामकेशने तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढले होते. ते त्याच्या लॅपटॉपमध्ये ठेवले होते. ज्यावेळी अमृताने ते सर्व त्याला डिलीट करायला सांगितले,त्यावेळी त्याने नकार दिला. त्यानंतर हत्येचा प्लॅन करण्याच आला. अमृताने या हत्येला अपघात दाखविण्यासाठी तिने अनेक क्राईम सिरिज पाहिल्या होत्या, त्यामुळे तिला कल्पना सुचली.

6 ऑक्टोबर रोजी गांधी विहारच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली होती. प्राथमिक माहिती मिळाली होती की, एसीचा स्फोट झाला आणि त्यावेळी आगीत होरपळलेला रामकेश मणी याचा मृतदेह सापडला, तिथे सीसीटिव्हीची पाहणी केली असता दोन जण चेहरा झाकून घरात येताना आणि जाताना दिसले. ते दोघं बाहेर पडल्यावरत ब्लास्ट झाल्याचे कळते. पोलिसांनी तपास सुरु केला असता रामकेश मीणा एका मुलीसोबत लिव्ह इन मध्ये राहत होता. सीसीटिव्हीतील त्या दोघांची ओळख पटली. त्याचवेळी अमृताच्या मोबाईलचे लोकेशन जवळपासच होते. तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्हा कबुल केला. तिने आपल्या पूर्वाश्रमीचा प्रियकर सुमीत आणि त्याचा मित्र संदीपसोबत मिळून हे हे हत्याकांड घडवून आणले,.सुमित कश्यप एलपीजी सिलेंडर डिस्ट्रीब्युटर आहे.

अमृता फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थीनी आहे. तिला माहित होते हत्येला अपघात कसा दाखवायचे. 6 ऑक्टोबरला अमृता आणि सुमित घरात येऊन त्यांनी रामकेशचा गळा आवळला. त्यानंतर त्याच्या मृतदेहावर तूप, तेल, दारु आणि घरात जितके ज्वलनशीर पदार्थ होते ते टाकले. त्यांनी घरात गॅस सिलेंडरचा पाइप ठेवला आणि सिलेंडर ऑन केला. गॅस उघडल्यानंतर आणि पेटवल्यानंतर गॅसचा स्फोट होण्यासाठी किती वेळ लागेल हे संदीपला माहित होते. अमृताने गेट ग्रिलमध्ये एक भोक पाडून बाहेर जाऊन ग्रिलमधून हात घातला आणि आतून दरवाजा बंद केला. अमृता आणि सुमित घराबाहेर पडल्यानंतर काही वेळातच स्फोट झाला. सीसीटीव्ही फुटेज वापरून खून हा अपघात म्हणून दाखवण्याचा हा प्रयत्न पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी हार्ड डिस्क, ट्रॉली बॅग, मृताचा शर्ट आणि दोन मोबाईल फोन जप्त केले.