भंडारा जिल्ह्याच्या नेरला येथील शेतीची खरेदी करून रजिस्ट्री केल्यानंतर खरेदी केलेल्या शेतीचे फेरफार करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांकडून तलाठ्याने लाचेची मागणी केली.
शेतकऱ्याला लाच देण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्याने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. लाच लुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचत एक हजार रुपयांची लाच घेतांना तलाठ्याला अटक केली आहे. लाच घेणाऱ्या तलाठ्याने नाव रवींद्र पडोळे असे आहे.