असं झालं तर… डिमॅट खात्यात नॉमिनी नाही?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिमॅट खात्यात नॉमिनी नसल्यास तुमचे खाते गोठवले जाऊ शकते किंवा तुमच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना शेअर्स मिळवण्यात कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नॉमिनीची माहिती किंवा ऑप्ट-आउटचा पर्याय न भरल्यास तुमचे डिमॅट खाते ट्रेडिंग किंवा व्यवहारासाठी लॉक केले जाऊ शकते.

खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी नसल्यास वारसांना शेअर्स हस्तांतरणासाठी सक्सेशन सर्टिफिकेट, विल किंवा कायदेशीर वारस प्रमाणपत्र दाखवावे लागते.

तुमच्या ब्रोकरच्या किंवा डिपॉझिटरीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन कधीही नॉमिनी जोडू शकता. एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडल्यास, प्रत्येकाची टक्केवारी निश्चित करा.

आधार कार्ड नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करून प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही अपडेट नॉमिनी येथे जाऊन नॉमिनीचे नाव अपडेट करू शकता.