आष्टी तालुक्यात डेंग्यूचे थैमान

360

आष्टी तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात नाल्यांची साफसफाई वेळेवर होत नसल्याने व हवामानातील बदलांमळे डासाच्या वाढत्या प्रादुर्भावाने डेंग्यूसह साथीच्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून थंडी, ताप यासारख्या आजाराने सर्व सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

परतीच्या पावसाने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच काही दिवसांपासून नाल्यांची सफाई वेळेवर होत नाही.अनेक ठिकाणी नाले तुंबलेले आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. वातावरणातील बदलामुळे व डासाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात सात ते आठ रुग्ण उपचार घेत आहेत. अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयातही उपचार घेत आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन डास प्रतिबंधक फवारणी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

वातावरण बदलामुळे तसेच घाणीच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते म्हणून नागरिकांनी आपल्या जवळाचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.डेंग्युच्या रुग्णांनी भरपूर पाणी पिणे,पपई,केळी यासारखी फळे खावेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या