मुंबईकरांची चिंता वाढली, जूनमध्ये सापडले मलेरियाचे 328 रुग्ण

339

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार सर्वोतोपरी उपाययोजना करत आहेत. मात्र, पावसाळ्याच्या तोंडावर आता मलेरियासह इतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. जून महिन्यांत मलेरियाचे 328 रुग्ण सापडल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनीया, लेप्टो, कावीळ असे साथीचे आजार डोके वर काढतात. कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत असताना मलेरियाचे रुग्ण सापडल्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. जून 2019 मध्ये मलेरियाचे 313 रुग्ण आढळले होते. तर या वर्षी जून महिन्यात मलेरियाचे 328 रुग्ण सापडले आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यू, लेप्टोची संख्या कमी असून या वर्षी डेंग्यूचे 4, तर लेप्टोचा एक रुग्ण सापडला आहे. दरम्यान, मलेरिया व डेंग्यूच्या डासांच्या ठिकाणांचा शोध घेऊन ती नष्ट केली जात आहेत तर लेप्टोसाठी घराघरात जाऊन तपासणी करण्यात येत आहे. चिकनगुनियाचाही अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही.

साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी पालिकेने नॉन कोविड रुग्णालये, दवाखाने, प्रसूतीगृह, आरोग्य वैंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. या आरोग्य सुविधांमार्पैत मलेरिया, डेंग्यू, हिवताप, अतिसार, कावीळ, लेप्टो यांच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. पावसाळ्यातील साथीच्या आजारांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती पालिका आरोग्य खात्याच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

वर्ष           मलेरिया रुग्ण
जून 2020      328
जून 2019      313
वर्ष             डेंग्यू रुग्ण
जून 2020       4
जून 2019       8
वर्ष             लेप्टो
जून 2020      1
जून 2019      5

आपली प्रतिक्रिया द्या