
सध्या पाकिस्तानी क्रिकेटची आणि क्रिकेट संघाची मैदानातील अवस्था अत्यंत दारुण झाली आहे. त्यांना एक विजय मिळवणे ही कठीण जात असताना आगामी आशिया कपमध्ये त्यांचा भेदरलेला संघ हिंदुस्थानला हरवू शकतो, असी दर्पोक्ती पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेदने व्यक्त केली आहे.
आशिया कप स्पर्धेपेक्षा सर्वांच्या नजरा 14 सप्टेंबरला होणाऱया लढतीकडे लागल्या आहेत. हा सामना होणार की नाही, याबाबत अनिश्चिततेचे वादळ असले तरी सारेच या सामन्याबद्दलच प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्याबाबत आकिबही बडबडला आणि म्हणाला, हिंदुस्थान-पाकिस्तान सामना हा जगातील सर्वात मोठा क्रिकेट सामना आहे. खेळाडूंना, चाहत्यांना आणि संबंधित प्रत्येकाला या सामन्याचे महत्त्व माहिती आहे. मला खात्री आहे की, हा 17 सदस्यीय संघात कोणत्याही संघाला हरवण्याची ताकद आहे. पाकिस्तान संघात दृढ आत्मविश्वास असून ते स्पर्धेत कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला धक्का देऊ शकतात.