फडणवीस जळगावात आले, पण खडसेंची भेट नाहीच

1790

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि माजी एकनाथ खडसे यांच्यातील वाद लपून राहिलेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा करणारे फडणवीस जळगावात आले, पण खडसेंना भेटलेच नाहीत. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होताच खडसे यांनी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही; मात्र विरोधी पक्षनेत्यांशी फोनवरून आपली चर्चा झाल्याचे स्पष्ट केले आहे.

विधानसभा त्यापाठोपाठ विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते खडसे राज्यातील पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. संधी मिळेल त्यावेळी फडणवीस यांच्याबाबत ते उघडपणे नाराजी व्यक्त करतात. यामुळे जळगाव दौऱयात फडणवीस त्यांची भेट घेणार काय याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, या दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी जैन हिल्स येथे विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. पाय फॅक्चर असल्याने एकनाथ खडसे यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत.

खडसे आणि फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. मात्र, खडसे यांनी फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती कळताच फोन करून विचारपूस केली.  खतांची साठेबाजी आदी विषयांवर विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली. फडणवीस यांनी विधानसभेत सर्व मुद्दे उपस्थित करू, असं आश्कासन दिल्याचे खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या