
मुंबई महापालिका क्षेत्रात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तब्बल 380 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था, सांताक्रूझ ते चेंबूर लिंक रोड उड्डाणपूल, मेट्रो कंपनीच्या कर्मचारी निवास इमारत आणि कलानगर उड्डाणपूल यांचे लोकार्पण करण्यात आले. शिवाय कोस्टल रोड 24 तास खुला करून अनेक सुविधांचेही आज लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने निवडणुकीच्या आधी राज्य सरकारकडून जाणीवपूर्व घाईघाईने विकासकामांचे लोकार्पण केल्याचे बोलले जात आहे.
मुंबईत डबेवाल्यांना साडे 25 लाखांत 500 चौरस फुटांचे घर
मुंबईतील डबेवाल्यांना 25 लाख 50 हजार रुपयांमध्ये मुंबईत 500 चौरस फुटांचे घर उपलब्ध करून दिले जाईल. आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वांद्रे पश्चिम येथे ’डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चे उद्घाटन प्रसंगी केली.