मराठी चित्रपटांना थिएटर उपलब्ध करून न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार, फडणवीस यांचे आश्वासन

मराठी चित्रपटांना थिएटर उपलब्ध करून न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिले.

महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांचा 8 डिसेंबर 2023 रोजी ‘एकदा येऊन तर बघा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे, परंतु हिंदी चित्रपटांच्या मनमानीमुळे खांडेकर यांच्या चित्रपटाला थिएटर मिळत नाही. हा मुद्दा आज विधान परिषदेमध्ये मांडला गेला.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर देताना, अशा मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, पण थिएटर उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वस्त केले.