देवगड – कुणकेश्वराचे मंदीर भक्तांसाठी खुले, नियमांचे पालन करत दर्शनाला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यास  राज्य सरकारने परवानगी दिली आहे. घटस्थापनेच्या दिवशी ही मंदिरे भक्तांसाठी खुली झाली आहेत.  जामसंडे येथे श्री दिर्बादेवी तसेच कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वराचे मंदीरही भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.  कुणकेश्वर मंदिर परिसरातील जागृत देवस्थान म्हणून नावारुपाला आलेल्या श्री देवी जोगेश्वरी मंदीरही भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.  श्री देव कुणकेश्वर मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले असले तरी पहिल्या दिवशी दर्शनासाठी भक्तांचा ओढा कमी असल्याचे पाहायला मिळाले.  कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. भक्तांना नियम समजावेत यासाठी मंदीर परिसरात फलकही उभारण्यात आले आहेत.