भाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन

672

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन लागू असून सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने श्रीराम मंदिरांमध्ये दरवर्षीप्रमाणे गर्दी न करता भाविकांनी श्रीराम जन्मोत्सव आपापल्या घरी साजरा करावा. श्रीराम मंदिरांमध्ये परंपरेप्रमाणे व विधिवत पूजेने श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. यावर्षीची परिस्थिती लक्षात घेता भाविकांनी मंदिरात येण्याऐवजी आपल्या घरातूनच मानस पूजा करावी असे आवाहन परळी वैद्यनाथ येथील गोराराम मंदिर, काळा राम मंदिर व सावळाराम मंदिर च्या वतीने करण्यात आले आहे.

परळी शहरातील विविध राम मंदिरांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहाने रामनवमी उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक कार्यक्रम व दुपारी श्रीराम जन्मोत्सव विधिवत पूजा, गुलाल उधळणे आदी कार्यक्रमांसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. परंतु यावर्षी राम जन्मोत्सवावर कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचे सावट आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण देशात टाळा बंदी (लॉक डाऊन) परिस्थिती असल्याने (सोशल डिस्टन्सन्सिंग) सामाजिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेता लोकांनी घराबाहेर न पडता आपापल्या घरात राहूनच श्रीराम जन्मोत्सव साजरा करावा.

मंदिरांमध्ये उत्सवाला व दर्शनाला येण्याऐवजी गुलाल उधळण्याच्या वेळी आपापल्या घरांमध्ये प्रभू श्रीरामाची मानस पूजा करावी असे आवाहन श्री गोराराम मंदिरचे मठाधिपती श्रीराम रामदासी, काळाराम मंदिर से विश्वस्त धर्माधिकारी व सावळाराम मंदिरचे वंशपरंपरागत पुजारी राजाभाऊ जोशी, रवी जोशी आदींनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या