धनंजय मुंडेंनी खोटं बोलणे सोडावे, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

2516
pritam-pankaja-munde

धनंजय मुंडे यांनी खोटं बोलणं सोडावे अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीला दर्शन घ्यायला पंकजा मुंडे गेल्या होत्या तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

परळीतील गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीला पंकजा मुंडे यांनी भेट दिली. मतदानापूर्वी आपण बाबांचे आशिर्वाद घ्यायला आले असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच हे गलिच्छ राजकारण आहे, यापूर्वी अशा प्रकारचे राजकारण झाले नव्हते. म्हणून राजकारण सोडण्याची आपली इच्छा मनात आली होती अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच आपली महिला आयोग, पक्ष कुणाकडून कुठलीच अपेक्षा नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. ज्या वक्तव्याची क्लिप धनंजय मुंडे यांनीच आपल्या फेसबुक प्रोफाईलवर पोस्ट केली होती. जर ती खोटी होती तर ती धनंजय मुंडे यांनी डीलीट का केली असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या