आप्पा तुमचा वारसा चालवत आहे, धनंजय मुंडे यांचे गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

1206

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने गोपिनाथ मुंडे यांचे पुतणे व राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी ट्विट करून त्यांच्या काकांना अभिवादन केले आहे. यावेळी त्यांनी ‘आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे’ असे सांगितले आहे.

‘ आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा…सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे. यासोबत त्यांनी गोपिनाथजी मुंडे यांच्या फोटोसमोर नतमस्तक होतानाचा फोटो शेअर केला आहे.

गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी जवळ असलेल्या गोपीनाथ गडावर ‘स्वाभिमान दिवस’ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी गोपिनाथ मुंडे यांचे असंख्य समर्थक गडाला भेट देऊन त्यांना अभिवादन करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या