धर्माबाद- बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून; आरोपी फरार

3204

धर्माबाद तालुक्यातील नागठाणा बुद्रुक येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री दीड वाजताच्या सुमारास खून झाला आहे. या घटनेने भाविकांत एकच खळबळ उडाली आहे.

गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला त्यानंतर गळा दाबून महाराजांची हत्या केली. महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. महाराजांचा मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून याठिकाणी भाविकांना ही माहिती समजताच एकच खळबळ माजली.

नागठाणा येथील मठामध्ये अन्य एकाचा मृतदेह सापडला
नागठाणा येथील ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्याच मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह सापडला असून मयताचे नाव भगवान शिंदे (रा. चिंचाळा ता. उमरी) असे असल्याचे समजते. घटनास्थळी पोलीस रवाना झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या