
देशाच्या संस्कृती शिक्षण संशोधनात कालिंगा इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (कीट) या विद्यापीठाचे भरीव योगदान आहे. त्यांच्याकडून संस्कृती शिक्षण क्षेत्रात संशोधन केल्याने जागतिक स्तरावर देशाची मान उंचावली असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय शिक्षण व काwशल्य विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काढले. ते ‘कीट’च्या 17 व्या वार्षिक पदवीदान समारंभात बोलत होते.
कीटचा वार्षिक पदवीदान समारंभ नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला असून 7032 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान बोलत होते. तुम्ही जे काही काwशल्य आत्मसात केले आहे त्याच्या मदतीने तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरावर पोहचू शकाल, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. दरम्यान कीटमधून विद्यार्थ्यांना आता आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमय्यी देवी (अम्मा) आणि एनाम सेक्युरिटीचे सहसंस्थापक वल्लभ भनशाली यांच्या जीवनावर अभ्यास करून डी. लिट. पदवी मिळवता येणार आहे. कीट शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, साहित्य, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रात चांगले काम करत आहे. कोरोना संकटात कीटने अनेक चांगले उपक्रम राबवल्याचे कीटचे संस्थापक अच्युत सामंता यांनी सांगितले. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कीटच्या दत्तेचंद (अॅथलीट), शिवपाल सिंग (भालाफेक), सी. ए. भवानीदेवी (तलवारबाजी) या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. असे खेळाडू देणारे कीट हे एकमेव विद्यापीठ असल्याचेही त्यांनी सांगितले.























































