
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी करत होते. याला देशभरातूनही प्रचंड पाठिंबा मिळत आहे. अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अखेर विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे सरकारला नमते घ्यावे लागले असून धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
“देशातील युवक हीच हिंदुस्थानची खरी ताकद आहे. देशातील तरुणांची दिशाभूल होऊ नये आणि ते कोणत्याही अफवांच्या किंवा भ्रमाच्या जाळ्यात अडकू नयेत, हा माझा निर्धार आहे. जंतर-मंतर आणि देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये, देशाची एकता अबाधित राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर प्रक्रियेत अडकू नये आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनाऐवजी शिक्षण व करिअरवर लक्ष केंद्रित करावे, या विचारातून मी माझा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला आहे”, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
Union Education Minister Dharmendra Pradhan resigns.
“…To ensure that anti-national elements are not benefitted by the situation at Jantar Mantar and across the country, that the nation remains united, students in India do not get tangled in legal complexities and focus on… pic.twitter.com/iNjU5Gufqd
— ANI (@ANI) July 25, 2026





























































