धुळ्यातील साक्री तालुक्यात होणार्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी आदिवासी कुटुंबाची झोपडी मधे येत असल्याने ती जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करून जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला.
या घटनेनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. ही सत्तेची मस्ती नाही का? इंग्रजांना आणि मुघलांनाही लाजवेल एवढी सत्तेची मस्ती आज सत्ताधारी करत आहेत. अशाप्रकारे आदिवासी कुटुंबाच्या संसाराची होळी केली जात आहे, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. असे ते म्हणाले. एक्सवर त्यांनी लिहिले की, अहो, अतिक्रमणही पावसाळ्यात काढून कोणाचे छत असे अकस्मात हिसकावून घेतले जात नाही. हे ट्विट त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत, आपल्या अधिकार्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी या आदिवासी कुटुंबाला विस्थापित केलंय, उद्या आपण याठिकाणी येणारच आहात तर या कुटुंबाचे पुनर्वसन आपण करायलाच पाहिजे. या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर सरकार केवळ भंपकबाजी करतंय, हे सिद्ध होईल. असा टोला लगावला.