‘धुरंधर-2’ ची प्रदर्शनाआधीच अमेरिकेत क्रेझ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणवीर सिंहचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘धुरंधर-2’ ला अमेरिकेत जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने ऍडव्हान्स बुकिंगमध्ये अमेरिकेत तीन कोटी रुपयांची कमाई केली आहे. अमेरिकेत प्रीमियर नाईटसाठी जवळपास 14,399 तिकिटांची विक्री केली आहे. ही तिकिटे 472 लोकेशन्स आणि 744 शोजसाठी विकली आहेत. ऍडव्हान्स बुकिंगमध्ये 3 लाख 30 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच तीन कोटींहून जास्त कमाई या चित्रपटाने केली आहे. आधी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिससह जगभरात कोटय़वधींचा गल्ला जमवला आहे. साडेतीन तासांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 19 मार्चला प्रदर्शित होत आहे.