‘धुरंधर’ची बॉक्स ऑफिसवर 27 कोटींची ओपनिंग

रणवीर सिंहचा बहुचर्चित ‘धुरंधर’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी 27 कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस पडत आहे. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित केला जात आहे. पहिला भाग प्रदर्शित झाला असून दुसरा भाग नव्या वर्षात 19 मार्च 2026 ला प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत चांगलाच भाव खावून गेला आहे. अक्षय खन्नाचे एक्सप्रेशन आणि डायलॉग्स दमदार आहेत. संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन यांच्याही भूमिका जबरदस्त आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. ‘धुरंधर’ने सलमान खानच्या ‘सिकंदर’ आणि अनित पड्डा व अहान पांडे यांच्या ‘सैयारा’ या चित्रपटाचाही विक्रम मोडला आहे. ‘सिकंदर’ने पहिल्या दिवशी 26 कोटी कमावले होते, तर ‘सैयारा’ने 21 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. ‘धुरंधर’ रणवीरच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग देणाऱया चित्रपटांपैकी एक बनला आहे.