… म्हणून घेतला पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय, अखेर अभिनेत्रीने मौन सोडले

3795

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये अनेक कपल्सचे संसार मोडले. अनेकांनी एकमेकांच्या संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यात एक नाव अभिनेत्री दिया मिर्झा आणि साहिल यांचेही होते. दोघांनी लग्नाच्या पाच वर्षानंतर अचानक घटस्पोट घेतला. लग्नापूर्वीही हे दोघे जवळपास 11 वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. एवढा काळ एकत्र घालवल्यानंतर अचानक घटस्फोट घेऊन दोघांनी चाहत्यांना धक्का दिला होता. आता याबाबत पहिल्यांदाच दियाने खुलासा केला आहे.

दिया मिर्झा 9 डिसेंबरला, आपल्या जन्मदिवशीच पतीपासून वेगळी झाली. याबाबत हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती सांगते, आयुष्यातील प्रत्येक बदल हा आव्हानात्मक, कठिण आणि त्रासदायक असतो, परंतु त्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. तसेच यामुळे तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळतो आणि तुम्ही आनंदाने पुढेही जाता. आणि मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजते की या दुख:चा खूपच चांगल्या पद्धतीने मी सामना करू शकले. मला फक्त तिथून बाहेर यायचं होते आणि स्वत:चा आवाज ओळखायचा होता. मी स्वत:ला आणि दुसऱ्यांना सशक्त बनवण्यासाठी प्रयत्न करत असते, असेही दिया म्हणाली.

dia-mirza

…म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला
दरम्यान, मीडियामध्ये आलेल्या रिपोर्टनुसार दिया मिर्झाचा संसार उद्ध्वस्त होण्यामागे कनिका ढिल्लन असल्याचे बोलले जात आहे. स्पॉटबॉने दिलेल्या वृत्तानुसार, कनिका ढिल्लन हिचे दिया मिर्झाचा पती साहिल याच्यासोबत अफेअर सुरू होते. याची कुणकूण दिया मिर्झाला लागल्याने दोघांमध्ये घटस्फोट झाला. तसेच कनिका ढिल्लन हिने देखील आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या