अरे देवा! डिझेलनेही शंभरी गाठली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग पाचव्या दिवशी इंधन दरवाढ झाली असून, पेट्रोल 109 रुपयांवर गेले आहे, तर डिझेलनेही शंभरी गाठली आहे. डिझेल शंभर रुपये प्रतिलिटर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शनिवारी पेट्रोल 30 पैसे, तर डिझेल 35 पैशांनी महाग झाले. त्यामुळे देशात बहुतांशी ठिकाणी पेट्रोल 107 ते 110 रुपयांवर गेले आहे. मुंबईत पेट्रोल 108.83 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 100.29 रुपये प्रतिलिटर झाले. पुण्यात पेट्रोल 109.51 रुपयांवर तर डिझेल 98.59 रुपये प्रतिलिटर झाले आहे.

राज्यात येथे डिझेल शतकपार

महाराष्ट्रात मुंबई, नांदेड, संभाजीनगर, अमरावती, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे डिझेल प्रतिलिटर शंभर रुपयांवर गेले आहे. डिझेलच्या शंभरीमुळे दसरा-दिवाळी या सणासुदीच्या दिवसांत महागाईचा भडका आणखी उडणार आहे.