उद्योजकांसाठी डिजिटल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

416

आयात-निर्यात क्षेत्रातील उद्योजकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऑग्रिकल्चरच्या वतीने ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’च्या डिजिटल सेवेस सुरुवात करण्यात आली आहे. या सुविधेमुळे ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ला चालना मिळेल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनच्या डिजिटल सेवेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. यावेळी सुभाष देसाई म्हणाले, डिजिटल स्वरूपात ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ची सुविधा देणारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ऍण्ड ऑग्रिकल्चर ही राज्यातील पहिली औद्योगिक संघटना आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करून कामकाज सुरू आहे. या सुविधेमुळे वेळ, पैसा व श्रम वाचणार आहेत. जन्माच्या दाखल्याप्रमाणे आयात-निर्यात क्षेत्रासाठी ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ महत्त्वाची भूमिका निभावणार आह़े

आपली प्रतिक्रिया द्या